मेरी कोमचे पदक निश्‍चीत

नवी दिल्ली – भारताची बॉक्‍सर मेरी कोम दहाव्या एआईबीएमधील महिला राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये उपान्त्यफेरीत पोहोचली आहे. त्यामुळे मेरीचे सातवे आंतरराष्ट्रीय पदक निश्‍चीत झाले असून या मालिकेत भारताचे एक पदक निश्‍चीत झाली आहे. मात्र, 54 किलो वजनी गटात मनीषा मौनला स्टोयका पैट्रोवाकडून पराभव पत्करावा लागला आहे.

पाच वेळा राष्ट्रीय विजेता असलेल्या मेरीने चीनच्या यू वु वर 5-0 (30-27, 29-28, 30-27, 29-28, 30-27) ने दणदणीत विजय मिळविला. आता गुरुवारी तिचा सामाना कोरियाच्या हयांग मि किम हिच्याशी होणार आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मेरीने यू वुवर आक्रमण करत दबाव आणला आणि तिचा सामन्यात एकतर्फी पराभव केला.

-Ads-

मेरी कोम या विजयानंतर म्हणाली की, “”हा विजय जास्त कठिण आणि जास्त सोपाही नव्हता. मी बॉक्‍सिंग रिंगमध्ये लक्ष विचलित होऊ देत नाही. त्याचाच मला फायदा होतो. चीनची बॉक्‍सर अनुभवी खेळाडू आहे, तिच्यासेबतची ही माझी पहिलीच लढत होती.”

गुरुवारी होणाऱ्या लढतीबाबत बोलताना मेरी कोम म्हणाली, कोरियाच्या हयांग मि किमला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मी हरविले होते, आता तिच्यासोबतच सेमीफायलमध्ये लढत होणार आहे. सध्या मी तिच्या व्हिडिओ समजून घेत आहे. त्यानुसारच मी लिच्याशी लढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)