#BottleCapChallenge: द्वारे श्रेयशचा हटके संदेश

मुंबई : सध्याच्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात चालू आहे. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Ae Dhakkan😎 #BottleCapChallenge #SaveWater #EveryDropCounts

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

दरम्यान, अभिनेता ‘श्रेयश तळपदे’ याने देखील हे चॅलेंज स्वीकारले असून, त्याने सुद्धा आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, श्रेयशने आपल्या व्हिडीओ मधून नागरिकांना एक सामाजिक संदेश दिला आहे. “आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून, पाण्याची बचत करा” असं त्याने म्हंटल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)