दोन्ही देशांना चीनचा संयम राखण्याचा सल्ला 

बिजींग  – भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम आणि शांतता पाळावी असा सल्ला दिला आहे.आजच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लू कंग यांनी म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपसातील विश्‍वासाचे वातावरण कायम राहींल असा प्रयत्न करायला हवा अशी आमची भूमिका आहे.

सध्याच्या जागतिक राजकारणात चीनने नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. पाकिस्तानने भारताच्या या कृतीवरून सध्या जो आक्रस्ताळेपणा चालवला आहे त्याला चीनकडून फूस मिळू शकते की काय असे वातावरण होंते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी दोन्ही देशांना जो संयमाचा सल्ला दिला आहे तो महत्वाचा मानला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)