‘भारत-पाक’ (1971) युध्दातील हिरो ‘ब्रिगेडियर कुलदीप सिंग’ यांचे निधन

नवी दिल्ली – साल 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांचे वयाच्या 78 व्या वर्षी आज, शनिवारी सकाळी फोर्टिस हाॅस्पिटलमध्ये निधन झाले. कुलदीप सिंग हे कॅन्सरने ग्रस्त होते.

लोंगेवालाची लढाई 4 ते 7 डिसेंबर 1971 या कालावधीत लढली गेली होती, थरच्या वाळवंटातील लोंगेवाला या भागाचा बचाव मेजर (नंतरचे ब्रिगेडियर) कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या 23 पंजाब कमांडंट कंपनीने केला. नवीन कुमक मिळेपर्यंत प्रयत्नांची शर्थ करणे अथवा पळून जाणे, हे दोन पर्याय कंपनीसमोर होते.

चांदपुरी आणि भारतीय सैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीतही लढत पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. पाकिस्तानच्या 2000 सैनिकांचा 90 भारतीय सैनिकांनी पराभव केला. छोट्याशा भारतीय सैन्याच्या फळीने पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून आपला भूभाग ताब्यात घेतला.

लोंगेवाला युद्धातील पराक्रमाबद्दल भारत सरकारने कुलदीप सिंग चांदपुरी यांचा महावीर चक्र देऊन गौरव केला होता. याच युद्धातील पराक्रमावर बॉर्डर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.सिनेमात मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलने साकारली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मेजर यांच्या मृत्यूनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)