ग्रेट पुस्तक : आम्रपाली

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार…

सुंदर असणे ही दैवी देणगीच आहे ती ज्याला लाभली ती व्यक्ती खरोखर भाग्यवानचं. थोडासा गर्व त्यावर नेहमीच चार चॉंद लावत आला आहे. पण जेंव्हा ते सौंदर्य संपूर्ण जिवन उद्‌वस्त करते तेंव्हा मात्र त्यासारखे दुर्दैव काय असू शकते? तर आज मी एका शापित सौंदर्यवतीची दुर्दैवी कहाणी सांगणारे पुस्तकं तुमच्यासाठी घेऊन आले आहे. अजब पब्लिकेशन चे प्रकाशन असलेले जनार्दन ओक यांनी लिहलेल्या या पुस्तकाचे नाव आहे आम्रपाली.

आम्रवृक्षाखाली सापडलेली आम्रपाली अतिशय रूपसंप्पन, गुणवान अन बुद्धिमान स्त्री तिच्या सौंदर्याची व्याख्या शब्दात करणे शक्‍यचं नाही अशी ती. आम्रपाली जशी,जशी मोठी होऊ लागलीं तसे तिचे सौंदर्य अधिकच खुलू लागले. वैशाली राज्यात ती चर्चेचा विषय ठरू लागलीं. या लावण्यवतीने राजकुमार हर्षदेवास मनोमन भावी पती च्या रूपात हृदयात स्थान दिले होते. भावी संसाराची दोघांची स्वप्ने पूर्ण होणारच होती पण वैशाली च्या प्रथेनुसार या लग्नास गणसंघाची परवानगी असणे आवश्‍यक होते. प्रत्येक उपवर कन्येस दरबारात आणले जात त्यानंतर त्याना लग्न मान्य असल्यास ते लग्न लावून दिले जात. आम्रपाली चे पिता आपल्या सौंदर्यवती मुलीस घेऊन दरबारात हजर झाले अन तिच्या सुंदरतेला दरबार अवाक होऊन पाहू लागला. गणसंघाने तीला पाहताच ती नगरवधु व्हावी म्हणून घोषणा केली. आम्रपालीचे सौंदर्य कोणा एकासाठी नसून ती गणसंघाची वधु म्हणून राहीली पाहिजे हे ऐकून आम्रपाली ने या दुष्ट प्रथेचा निषेध केला. पण प्रथेनुसार हे घडले नाही तर गणसंघात आपसात युद्ध होऊन वैशालीचे मोठे नुकसान होणार होते. दुर्दैवी पित्याने हा निर्णय हतबल होऊन आम्रपाली वर सोपवला.

अनेकांची पत्नी होणं तिला मान्य नसते. मृत्यूलासुद्धा तिच्या समीप येऊ न देणाऱ्या गणसंघाचा ती धिक्कार करते. काहीच पर्याय न उरल्यामुळे शेवटी नाईलाजाने काही अटी घालून तिला या नगरवधुपदाचा स्वीकार करावा लागतो..सौंदर्य शाप ठरलेली आम्रपाली स्वप्नांना तिलांजली देत संपूर्ण वैशालीच्या गणसंघाचा सूड घेण्याचे मनोमन ठरवून ती त्या पदावर आरूढ होते. अन चालू होतो तिचा प्रवास. पुढे अनेक राजे महाराजे तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिच्या दाराशी येतात त्यात मगध देशाचा राजा बिंबिसार मोहित होऊन तिच्या पुत्रास गादीवर बसवण्याचे वचन देतात. हे वचन पूर्ण होते का ? आम्रपाली कोणता त्याग करते? ती कोणाची मुलगी होती ? पुढे तिचे काय होते. भगवान गौतम बुद्धांचे मार्गदर्शन तीला कसे उपयोगी ठरते. वैशाली नगराचे पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावे लागेल. कथा खिळवून आणि उत्सुकता ताणून धरणारी आहे. आम्रपाली चा सौंदर्यवती ते नृत्यांगना. नगरवधू ते साध्वी हा प्रवास नक्कीच वाचण्यासारखा आहे नक्की वाचा.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)