‘न्यायमूर्ती संभाजीराजे’ पुस्तकातून अनेकांना मिळेल प्रेरणा

न्या. मोरे : पुस्तक प्रकाशन माहितीपटाचे प्रसारण सोहळा

नगर  – स्व.न्या. संभाजी म्हसे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात विखे-गडाख निवडणुकीचा खटला चालवला. अतिशय हुशारीने चालवलेला हा खटला ते जिंकले या खटल्याने त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गेले. हा खटला त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला त्यांना न्यायाधीशाच्या खुर्ची पर्यंत घेवून गेला . अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. काही केसेस फार अवघड असतात मात्र न्यायमूर्ती संभाजी म्हसेंचा कॉमनसेन्स खूप स्ट्रॉंग होता. त्यांच्या सात्विक संतापाचा मला अनुभव होता. डायलिसिस चालू असतानाही न थांबता त्यांनी प्रभावीपणे न्यायदान केले. त्यांच्या मनावरील ताबा व मनोधैर्य पाहून कायम प्रेरणा वाटत असे. हे सर्वसाधारण व्यक्तीचे काम नाही. एक वकील ,न्यायाधीश म्हणून ते कायम सामान्य राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र त्यांच्या जीवनावरील न्यायमूर्ती संभाजीराजे या पुस्तकातील लेख वाचून व त्यांच्या जीवनावरील डॉक्‍युमेंटरी पाहून त्यातून स्फुर्ती घेऊन अनेक जण न्यायमूर्ती म्हसे पाटील होण्याचे जरी ठरवतीले हेच या समारंभाचे फलित आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी केले.

दिवंगत न्यायमूर्ती संभाजी म्हसे यांच्या जीवनकार्यावर आधारित न्यायमूर्ती संभाजी राजे या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे यांच्या हस्ते माऊली सभागृह येथे समारंभपूर्वक झाले. यावेळी न्यायमुर्ती संभाजी शिंदे, न्यायमुर्ती प्रसन्न वराळे, न्यायमुर्ती पी.आर.बोरा, राज्याचे पब्लिक प्रोसीक्‍युटर अॅड.आशुतोष कुंभकोणी, न्या.एस. बी.देशमुख, विशेष सरकारी वकील उज्वल निकम, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे,पूर्णवाद परिवाराचे अॅड. गुणेश पारनेरकर, अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. शेखर दरंदले, ऍड.हळवे आदिंसह नगर जिल्हा, औरंगाबाद येथून मोठ्या संख्येने वकील वर्ग व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, अनेक उच्चपदे न्यायमूर्ती संभाजी म्हसे यांनी मिळवले. प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप ते ठेऊन गेले. न्यायमूर्ती झाले तरी सामान्य व्यक्ती म्हणून काम केले. राज्यात गाजलेला विखे – गडाख निवडणुकीचा खटल्यात त्यांचा महत्त्वाचा रोल होता. या निकालामुळे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली. निवृत्तीनंतरही अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतली. अन्यायग्रस्त ग्राहकांना न्याय मिळवून दिला. त्यांचा जीवनपट येणाऱ्या पिढीस दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल.

अॅड. गुणेश पारनेरकर म्हणाले, न्यायमूर्ती संभाजी म्हसे यांच्या जीवनपटावरील हे पुस्तक अनेकांना प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही प्रेरणादायी आहे. अनेक संघर्षांना त्यांनी तोंड दिले मात्र थोडेही त्यांचे आत्मबल कमी झाले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवादाचे अनेक उपक्रम राबवले गेले.

अॅड. उज्वल निकम अॅड.आशुतोष कुंभकोणी , न्या. बोरा यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकात राजेश्‍वरी जगताप म्हणाल्या, कष्टाळू वकील व द्रष्टा न्यायमूर्ती मला वडील म्हणून लाभले मी देवाचे असीम आशीर्वाद मानते. त्यांच्या जीवनपटावरील या पुस्तकात अनेक उच्च व सर्वोच्च न्यायमूर्तीचे, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी 58 लेख लिहिले आहेत. तसेच प्रतिकूल परिस्थितीतून ताऱ्यांकडे कडे चाला या डॉक्‍युमेंटरी मुळे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन मिळेल म्हणून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या प्रकाशन सोहळ्यात नगरमधील, औरंगाबाद खंडपीठ वकील वर्ग उपस्थित होते. तसेच नगरमधील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.  पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)