धक्कादायक : तीन वर्षाच्या मुलीच्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

मेरठ – उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका तरुणाने तीन वर्षाच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ जिल्ह्यातील मिलाक गावातील तीन वर्षाची मुलगी मंगळवारी घराबाहेर खेळत होती. यावेळी एका तरुणाने चॉकलेट असल्याचे सांगून तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो फोडला. यामुळे ती ५० टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)