मुंबई सिंगापूर विमानात बॉम्बची धमकी 

सिंगापूर/नवी दिल्ली – मुंबईवरून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानामध्ये आज बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यामुळे सिंगापूरच्या हवाई दलाने या विमानाच्या सुरक्षेसाठी दोन “एफ-16’विमाने पाठवून दिली. या प्रकरणी एक महिला आणि एका लहान मुलाला पोलिसांकडून चौकशीसाठी थांबवून घेण्यात आले आहे.

सिंगापूर एअरलाईन्सचे “एसक्‍यु 423′ हे विमान मुंबई विमानतळावरून निघाल्यावर सिंगापूर एअरलाईन्सला 11.36 वाजता बॉम्बबाबत पहिली धमकी मिळाली होती. विमान मुंबईवरून सिंगापूरला निघाले तेंव्हा त्यामध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा संदेश मिळाला होता. हे विमान मंगळवारी सकाळी 8 वाजता सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले. हे विमान सिंगापूरच्या विमानतळावर उतरेपर्यंत दोन लढाऊ विमान त्याच्या सह उड्डाण करत होते. या विमानामध्ये 263 प्रवासी होते. या धोक्‍याच्या इशाऱ्याबाबत चौकशी केली जात आहे. या संदर्भात प्रवाशांना झालेल्या असुविधेबाबत आम्हाला खेद आहे. मात्र याप्रकरणी अधिक कोणतीही माहिती दिली जाऊ शकणार नाही, असे सिंगापूर एअरलाईन्सने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)