दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब तब्बल 70 वर्षांनंतर फुटला

फ्रॅंकफर्ट (जर्मनी) – जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरातील माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब रविवारी सापडला. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन विमानाने हा बॉम्ब टाकला होता. हा बॉम्ब 70 वर्षांनंतरही जिवंत असल्यामुळे नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून बॉम्ब शोधक पथकाने या बॉम्बचा स्फोट घडवून आणला आणि नष्ट केला.
हा बॉम्ब नदीत साधारण 5 ते 6 मीटर बॉम्ब शोधक पथक खोल घेऊन गेले. या बॉम्बचा त्यानंतर धमाका करण्यात आला. नदीतील जीवांना काही धोका होऊ नये म्हणूण नदीत आधी छोटे स्फोट करण्यात आले. जेणेकरुन नदीतील जीव दूर निघून जातील.

आजूबाजूच्या 600 लोकांना हा जोरदार धमाका करण्याआधी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की, फायर ब्रिगेड, पोलीस आणि रेड क्रॉसचे 350 अधिकारी या संपूर्ण अभियानदरम्यान मदतीसाठी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये 9 एप्रिलला फायर ब्रिगेडची टीम डायव्हिंगचा सराव करत होती.त्यांना हा बॉम्ब यादरम्यान आढळला. सुरुवातीला हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण 250 किलो वजनाचा हा बॉम्ब डिफ्यूज करताना फुटू शकतो अशी भीती करण्यात आली होती.
70 वर्षे दुसऱ्या महायुद्धाला लोटली असली तरी सुद्धा त्या काळातील जिवंत सक्रिय बॉम्ब अजूनही आढळतात. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध हे संपले होते. यात मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले होते. जर्मनीवर त्यावेळी टाकण्यात आलेले काही बॉम्ब फुटलेच नाहीत. त्यामुळे हे बॉम्ब आताही फुटण्याचा धोका असतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here