तुर्कीतील दारूगोळा कोठारात स्फोट-7 जवान ठार, 25 जखमी 

अंकारा (तुर्की) – तुर्कीतील एका दारुगोळा कोठारात झालेल्या स्फोटात 7 जवान ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप अर्दोगन यांनी या बाबत माहिती दिली आहे. हक्कारी प्रांतातील दारूगोळा कोठारात हा स्फोट झाला. मृतांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

इराक आणि इराण सीमेलगत असलेल्या सेमदिनली भागातील कोठारात हा स्फोट झाल्याचे हक्कारीच्या राज्यपालांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. कुर्दिस्तान वर्करस पार्टी-पीकेके (Partiya Karker।n Kurdistan।) ला एका बाजूने दहशतवादी घोषित करायचे, त्यांच्या नेत्यांवर बक्षिसे जाहीर करायची आणि दुसऱ्या बाजूने तिला मदत करायचे, असला दुटप्पी खेळ कोण करत आहे, याची आम्हाला चांगली माहिती आहे, असे तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप अर्दोगन यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख अर्थातच अमेरिकेवर होता. मात्र हे चालणार नाही आणि दहशतवादी संघटनांना साथ देणारांच्या पदरी निराशाच पडेल तुर्कीचे लष्कर उत्तर इराकमधील दहशतवाद नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)