पुणे जिल्ह्यातील सुमारे 59 हजार कर्मचारी संपावर

 बुधवार आणि गुरुवारीही राहणार संप सुरू

पुणे: सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा करावा यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये ठप्प झाली होती. यामुळे शासकीय कामकाजाला खीळ बसली. जिल्ह्यातील सुमारे 59 हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील कायालये, जिल्हा परिषद, कृषी, जलसंपदा, सहकार, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आरटीओ आदीविभागांमधील कार्यालयांमध्ये सकाळपासून शुकशुकाट होता. शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये सकाळी सर्व कर्मचारी एकत्रित आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत अधिकारी वगळता अन्य कर्मचारी कामावर नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग-3 आणि 4 चे सुमारे 1 हजार 400 कर्मचारी आहेत. त्यापैकी कोणीही मंगळवारी कार्यालयांत आले नव्हते. त्यामुळे येथे संपाला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच येथे बंदोबस्तासाठीही शिपाई नव्हते, त्यामुळे होमगार्डस्‌ तैनात करण्यात आले. कर्मचारीच कामावर नसल्यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये फक्त अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कर्मचारी संपावर गेल्यामुळे महसूल, शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोषागार, फोटोझिंको अशा विविध कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत. तसेच जिल्ह्यातील तलाठी आणि मंडलाधिकारी स्तरावरील तलाठीही संपावर गेल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती. मात्र, अधिकारी वर्गाने या मोकळ्या वेळेत कामकाज मार्गी लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)