बॉलिवूडची लोलो आता वेबसीरीजमध्ये

बॉलिवूडमध्ये “लोलो’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री करिश्‍मा कपूरने काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांबच आहे. त्यातदेखील जरी करिश्‍मा पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. त्यात आता तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण करिश्‍मा पुन्हा एकदा आपला करिश्‍मा’ दाखवण्यास सज्ज झाली असून ती एकता कपूरच्या एक वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचे वृत्त आहे.

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डेंजरर्स इश्‍क’ या चित्रपटात करिश्‍माने शेवटचे काम केले होते. त्यानंतर तिच्या वाटेला कोणतीच भूमिका आली नाही. पण आता लवकरच ती वेबसीरिजमधून पुनरागमन करत आहे. या वेबसीरिजची निर्मिती अल्टा बालाजीच्या अंतर्गत होत आहे. अमेरिकन टीव्ही सीरिज प्रिटी लिटील लायर्सवर आधारित ही सीरिज असून करिश्‍मा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजचे “मेंटलहुड’ असे नाव असून यामध्ये संघर्ष करणाऱ्या पाच मातांची कथा दाखवण्यात येणार आहे. पण अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)