बॉलीवूडमध्ये शनाया करणार पदार्पण

बॉलीवूडमध्ये सध्या स्टार किड्‌सची रेलचेल आहे. बालपणापासून याच वातावरणात राहिल्यामुळे अभिनयक्षेत्राकडे पावले वळणे या मंडळींसाठी स्वाभाविक होते. त्यामुळे आजवर अनेक स्टार किड्‌सनी बॉलीवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. या स्टार किड्‌समध्ये आता आणखी एका स्टार किडची भर पडत असून, हिला मात्र अभिनय न करता दिग्दर्शनाच्या द्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची इच्छा आहे.

बॉलीवूडमध्ये आजही अभिनयाची यशस्वी कारकीर्द असणारे अभिनेते अनिल कपूर यांचे भाऊ संजय कपूर हेही एके काळी बॉलीवूडमध्ये अभिनेते म्हणून आले, मात्र यशाने त्यांना हुलकावणी दिली. आता संजय कपूर यांची कन्या शनाया बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र शनाया अभिनयक्षेत्रामध्ये न येता, सहायक दिग्दर्शक म्हणून चित्रसृष्टीतील तिचा प्रवास सुरु करणार आहे. लवकरच सुरु होत असलेल्या एका चित्रपटासाठी शनाया सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. या संदर्भात संजय कपूर आणि त्यांची पत्नी महिप यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

दरम्यान, शनायाची चुलत भावंडे, म्हणजेच अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि सोनम कपूर यशस्वी अभिनेते असून, शनायाची जवळची मैत्रीण असलेली अनन्या पांडे ही देखील लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे. शनायाप्रमाणेच सोनम आणि अर्जुन कपूर यांनी ही बॉलीवूडमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणूनच केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)