बॉलिवूड भीतीपोटी मोदी सरकारला समर्थन देत आहे – प्रिया दत्त

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत सभा घेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले असून राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्व पक्षातील नेत्यांमध्ये प्रचार दरम्यान शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थनबाबत टीका केली आहे.

प्रिया दत्तने यांना बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत असल्याबद्दल प्रश्न विचारले असता, ‘हे भीतीपोटी मोदी सरकारला समर्थन देत आहे. ‘तुम्हाला वाटत नाही का यामागे भीती हे कारण आहे? मला तरी असंच वाटतं. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’, असा प्रश्न प्रिया दत्त यांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)