राणी मुखर्जीच्या ‘या’ सिनेमाने तोडला ‘पीके’चा रेकाॅर्ड

मुंबई : बाॅलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ सिनेमाने चीनमध्ये आमिर खानच्या ‘पीके’ सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे. राणी मुखर्जीने ‘हिचकी’ या सिनेमाव्दारे बाॅलीवूडमध्ये पुरागमन केले होते. चीनी बाॅक्स आॅफिसवर 12 आॅक्टोंबरला राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने कमाईमध्ये एक ‘नवीन रेकॉर्ड’ केले आहे.

‘हिचकी’ या सिनेमाने चीनमध्ये  कमाईमध्ये आमिरच्या पीके सिनेमास मागे टाकले आहे. सिनेमाचा चीनमध्ये पाचवा सर्वात मोठा सिनेमा म्हणून नोंद झाली आहे. हिचकी सिनेमाने चीनमध्ये आतापर्यंत ‘121 कोटी’ रूपये कमाई केली आहे. तर आमिर खानच्या पीके सिनेमाने ‘120 कोटी’ रूपये कमावले होते. ‘हिचकी’ सिनेमाचे एकूण कलेक्शन ‘205.5’ कोटी रूपये झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘हिचकी’ सिनेमाचे यश पाहता निर्मात्यांनी हा सिनेमा ताइवान आणि हाँगकाँग मध्ये प्रदर्शित करण्यचा निर्णय घेतला होता.

राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ चीनमध्ये सुपरहिट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)