सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘करण जोहर’च्या डुप्लीकेटचा फोटो

बाॅलीवूडमधील आघाडीचा फिल्ममेकर ‘करण जोहर’ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. आपल्या सगळ्या अॅक्टिव्हीटी तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलिकडच्या दिवसात ट्विटरवर ‘करण जोहर’ याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याने स्वत: करणसुध्दा आश्चर्यचकित झाला आहे.

दरम्यान सोशल मीडियावर त्याच्या एका चाहत्याने एका असा फोटो पोस्ट केला आहे की, त्यामध्ये त्या फोटोमधील व्यक्ती हुबेहुब ‘करण जोहर’ याची डुप्लीकेट काॅपी दिसत आहे. करण जोहरने या चाहत्याचे ट्विट री-ट्विट केले आहे. त्याने री-ट्विट करताना लिहिले आहे की, ‘काही ट्विट तुम्हाला री-ट्विट करावे लागतात आणि त्यापैकी हे एक ट्विट आहे’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करणने जे ट्विट शेअर केले आहे, ते उस्मान खान नावच्या व्यक्तीचे आहे, तो व्यक्ती हुबेहुब करण जोहर सारखा दिसतो. उस्मान याची प्रोफाइल पाहिल्यानंतर तो पाकिस्तानमधील रहिवासी असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)