चार वर्षानंतर पूनम ढिल्लन ‘या’ सिनेमाव्दारे करणार बाॅलीवूडमध्ये पुनरागमन

पुणे- बाॅलीवूडमध्ये सध्या सत्तर आणि ऐंशी दशकात आपल्या काळात प्रसिध्द असलेल्या अभिनेत्री पुनरागमन करत आहेत. बाॅलीवूडमधील 70-80 दशकातील सुंदर अभिनेत्री पूनम ढिल्लन चार वर्षानंतर सिनेमात पुनरागमन करत आहे.

अभिनेत्री पूनम पूनम ढिल्लन हिच्या चाहत्यासाठी चांगली बातमी आहे. पूनम ढिल्लन लवकरच लव रंजन यांच्या सिनेमात आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. नवजोत गुलाटी दिग्दर्शित ‘जय मम्मी दी’ या विनोदी सिनेमाव्दारे पूनम ढिल्लन बाॅलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सिनेमामध्ये प्यार का पंचनामा 2 सिनेमातील अभिनेता सनी सिंह आणि सोनाली सहगल प्रमुख भूमिकेत आहेत. सुप्रिया पाठक आमि पूनम ढिल्लन या अभिनेत्री सिनेमात आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जय मम्मी दी’ हा सिनेमा 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. पूनम ढिल्लन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, चार वर्षापूर्वी डबल टी ट्रबल या सिनेमात पूनम ढिल्लन हिने काम केले होते. या सिनेमात धर्मेंद्र हे ही होते. पूनम ढिल्लन यांनी त्रिशूल, नूरी, काला पत्थर, दर्द, तेरी कसम, तेरी मेहरबानिया, गिरफ्तार, कर्मा ाणि सोने पे सुहागा अशा हिट सिनेमात काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)