बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा छोटा मुलगा नमाशी चक्रवर्ती हा लवकरच चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. त्याच्यासोबत निर्माता साजिद कुरैशीची मुलगी आमरीन कुरैशीही बॉलीवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
डायरेक्टर राजकुमार संतोषी यांच्या आगामी “बॅड बॉय’मध्ये हे दोन्ही युवा कलाकार झळकणार आहेत. या कलाकारांची अनेक ऑडिशन झाल्यानंतर निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राजकुमार संतोषी यांना आतापर्यत “अंदाज अपना अपना’, “घायल’, “दामिनी’ आणि “घातक’ यासारख्या अनेक हिट चित्रपटांची निर्मीती केलेली आहे.
“बॅड बॉय’ चित्रपटाचे शूटिंग बंगळूरू येथे सलग 65 दिवस करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईतही शूटिंग होणार आहे. तसेच चित्रपटातील काही गाण्यांचे चित्रिकरण भारताबाहेर होणार असल्याचे समजते.
याबाबत साजिद कुरैशी म्हणाले, सध्या दोन्ही कलाकार हे विदेशात आहेत. ते मायदेशी परतताच त्यांच्यासोबत चित्रपटाचे शेडयुल आखण्यात येईल. तसेच राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून मुलीचे बॉलिवूडमध्ये पर्दापण होत असल्याने वडिल म्हणून मला खूप आनंद होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्या मोठा मुलगा मिमोह चक्रवर्ती अनेक चित्रपटात झळकला आहे. परंतु अद्याप त्याच्या कोणत्याही चित्रपटाला यश मिळालेले नाही.