अंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी

शिर्डी : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सहपरिवार साई दर्शन घेतले. समवेत उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आदी.

साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकूट केला दान

कर्मचाऱ्यांकडून कायद्याची पायमल्ली

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. साईबाबा संस्थानचे सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी, शीघ्र कृती दलाचे जवान यांनाच यावेळी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे साईबाबा संस्थानने लावलेल्या मोबाईल बंदीचा फलक काढून टाकला तर नियमांची पायमल्ली तरी होणार नाही.

शिर्डी – देवाच्या दरबारात सोन्याच्या वजनाला आणि किमतीला महत्त्व नसून, अंतःकरणातील भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी शिर्डीत केले. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी साईचरणी सुवर्ण मुकूट दान केला.

सिनेअभिनेत्री शेट्टी यांनी परिवारासह गुरुवारी सायंकाळी शिर्डीत धुपारतीला हजेरी लावून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पती राजकुंद्रा, मुलगा, बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित होते. शिल्पा यांनी साईचरणी सुवर्ण मुकूट दान केला. साईबाबा संस्थानच्या वतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल, मूर्ती देऊन सत्कार केला.

यावेळी साई मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते. साई दर्शनानंतर शिल्पा शेट्टी म्हणाल्या, मी साईबाबांची निस्सीम भक्त आहे. वर्षातून एकवेळ साईचरणी लीन होण्यासाठी येते. मागील वेळी बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. त्यावेळी बाबांच्या चरणी नवसपूर्ती केली होती. त्याची फेड शताब्दी वर्षात करण्यासाठी मी परिवारासोबत धूपारतीला हजेरी लावून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले आहे.

सुवर्ण मुकुटाचे वजन आणि किमतीपेक्षा भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे. यावेळी आय.पी.एल. बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, क्रिकेटमध्ये हार-जीत होत असते. त्याचा काहीही निकाल लागला, तरीही बाबांच्या दरबारी हजेरी लावण्यासाठी मी राहील, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
4 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)