अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी आपल्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर चर्चेत असतानाच पुन्हा एकदा अक्षय कुमार चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फानी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या ओडिशातील पीडितांना अक्षय कुमारनं एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
दरम्यान, नामांकित वृत्तपत्राच्या दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारनं ओडिशामध्ये आलेल्या फानी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.