‘माझे सर्व चित्रपट बॅन करायला हवेत’.. जाणून घ्या, असं का म्हटली ट्विकंल खन्ना 

लेखिका आणि चित्रपट निर्माती ट्विकंल खन्ना हिने गंमतीने म्हटले की, ‘ज्या चित्रपटामध्ये मी प्रमुख भूमिका म्हणून काम केलं आहे, त्या सर्व चित्रपटांवर बॅन लावला पाहिजे, त्यामुळे ते चित्रपट कोणालाही पाहता येणार नाही’.

दरम्यान ट्विकंल हिने शुक्रवारी मुंबईत ‘पायजामाज आर फाॅरगिविंग’  या तिनं लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिचा पती अक्षय कुमार, आई डिंपल कपाडिया, करण जोहर, रणवीर सिंग, सोनम कपूर, बाॅबी देअोल, तान्या देअोल, आर बाल्की, गौरी शिंदे, माना शेट्टी आणि सिंकदर खेर उपस्थित होते.

या दरम्यान ट्विकंलला विचारले की, ‘तुझा असा कोणता चित्रपट आहे की जो परत बनवायला पाहिजे’?, तेव्हा यावर तिने गंमतीदार उत्तर देत म्हटलं की, ‘मी एकसुध्दा हिट चित्रपट दिला नाही. मला वाटतं माझे सर्व चित्रपट बॅन करायला हवेत, कारण त्यामुळे ते चित्रपट कोणालाही पाहता येणार नाही’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)