‘हाऊसफुल्ल 4’ मध्ये नाना पाटेकरांच्या जागी ‘हा’ अभिनेता ?

मुंबई – दक्षिण भारतीय सिनेमातील सुपरस्टार राणा दग्गुबाती हा हाउसफुल 4 मध्ये नाना पाटेकर यांच्या जागी भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

तनुश्री दत्ताने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपणहून ‘हाऊसफुल्ल 4’ हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता या सिनेमात नाना यांच्या जागी  बाहुबल फेम राणा दग्गुबाती याची निवड करण्यात आली आहे. राणा या सिनेमात गजल गायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.

दग्गुबाती याने म्हटलं आहे की, पहिल्यांदाच मी अशा प्रकारच्या काॅमेडी सिनेमात काम करत आहे. तसेच मला अक्षय कुमार, नाडियाडवाला आणि फरहाद अशा कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळत आहे, ते माझ्यासाठी  खूपच महत्वाचं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)