बोको हरामचे 280 दहशतवादी ठार-नायजेरियन लष्कराची कारवाई

नियामी (नायजेरिया): नायजेरियन लष्कराने बोको हरामचे 280 दहशतवादी मारल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. नायजेरियाच्या सीमाभागातील चाड बेटे आणि कोमाडोहू नदीच्या किनारी प्रदेशात लष्कराने मोठी कारवाई केली आहे. लष्कराची कारवाई आठवडाभर चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

चाड सरोवरातील बेटे आणि कोमाडोहू नदीच्या किनारी प्रदेशात बोको हराम दहशतवाद्यांनी नायजेरियन लष्कराच्या ठाण्यांवर अनेकदा हल्ले केले आहेत. बोको हरामच्या ठिकाणांवर एकाच वेळी हवाई आणि जमिनीवरूनही योजनाबद्ध हल्ले करण्यात आले. ही कारवाई 28 डिसेंबरपासून चालू होती. पश्‍चिम आफ्रिकेतील देशांच्या नेत्यांनी मिळून या खास लष्करी कारवाईबाबत योजना केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाड, कॅमेरून, नायजेरिया आणि आणि नायजर या चार देशांना लागून चाड सरोवर खोऱ्याचा भाग पसरलेला आहे आणि बोको हराम याच प्रदेशात सर्वाधिक सक्रिय आहे. बोको हरामच्या हल्ल्यांमध्ये आजवर 27,000 पेक्षा अधिक नागरिक मारले गेले आहेत आणि सुमारे 20 लाख नागरिकांना तेथून पलायन करावे लागले आहे.

या कारवाईत बोको हरामचे 280 दहशतवादी मारले गेले असले, तरी लष्कराचा एकही जवान मारला गेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)