कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेचाही उडाला बोजवारा – येचुरी

नोटबंदीनंतरच देशात रोख पैशांचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली: नोटबंदीचा निर्णय अस्त्तिवात यायच्या आधी देशातील चलनात 17 लाख 97 हजार कोटी रूपयांच्या नोटा अस्तित्वात होत्या पण आता नोटबंदी नंतर रोखीचा व्यवहार कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढला असून आज देशातील बाजारात तब्बल 21 लाख 41 हजार कोटींच्या नोटा अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे मोदींची नोटबंदी आणि त्यांचे हेतू साफ फसले आहेत असे मार्क्‍सवादी कम्युनिस्टपक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

काळापैसा बाहेर काढण्याचा त्यांचा हेतुही फसला असून उलट काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदीचा वापर केला गेला असल्याचा दावाही येचुरी यांनी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सल्ला देऊनही त्यांचा सल्ला डावलून हा निर्णय घेतला गेल्याचे स्पष्ट झाले असून नोटबंदीमुळे देशाच्या रोजगाराचे आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेचाही बोजवारा उडाला आहे. सरकारचा आणखी एक जुमला लोकांच्या समोर ठसठशीतपणे उघडा झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)