बोगस डॉक्‍टर जेरबंद

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे – एम.बी.बी.एस. केले नसतानाही केल्याचे भासवून प्रॅक्‍टीस करणाऱ्या बोगस डॉक्‍टरला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले. त्याला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गालीब गुलाब शेख (वय 45, रा. येरवडा) असे त्याचे नाव आहे. याबाबत महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरूपती पांचाळ यांनी फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2018 ते 6 मार्च 2019 या कालावधीत ही घटना घडली. शेख याने कोणतीही वैद्यकीय पदवी घेतलेली नाही. तरीही येरवडा येथील भाजी मार्केटसमोर नशा मुक्ती नावाने व्यवसाय करत होता. याची जाहिरात त्याने जस्त डाईल या संकेतस्थळावर स्वत:च्या फोटोसह केली आहे.

या प्रकरणात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने दारूचे व्यसन सोडविण्यासाठी कोणत्या व्यक्तींना औषधे दिली आहेत. त्याच्याकडे मिळून आलेल्या राजस्थान औषधालयच्या कागदपत्रांचा तपास करणे, असलेली औषधे जप्त करण्याठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)