मेक्‍सिकोच्या अध्यक्षांच्या बोइंग विमानाचा लिलाव

मेक्‍सिको: मेक्‍सिकोच्या अध्यक्षांचे बोईंग विमान विक्रीसाठी काढले असून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. मेक्‍सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मन्युअल लोपेझ ऍब्राडोर यांच्या आदेशानुसारच ही विक्री होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेक्‍सिको शहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अध्यक्षांच्या बोईंग 787-8 ने उड्डाण केले असून कॅलिफोर्नियामधील व्हिक्‍टरव्हिले येथे ते जाणार आहे. व्हिक्‍टर व्हिले येथेच विमानाचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी त्याची दुरुस्ती करून त्यात बदल करण्यात येणार असल्याची माहिती मेक्‍सिकोच्या अर्थ मंत्रालयाच्या सचिवालयाने दिली आहे.

सन 2012 मध्ये तत्कालीन अध्यक्ष फिलिप काल्डॅरिन यांनी त्याची खरेदी केली असली, तरी फेब्रुवारी 2016 पर्यंत ते मेक्‍सिकोमध्ये पोहचलेले नव्हते. तेव्हा त्याची किंमत 21.87 कोटी डॉलर्स होती. विमानाच्या किमतीवरून त्यावेळी त्यावर मोठीच टीका झाली होती. 80 आसन क्षमता असलेल्या या विमानात बाथरूम, बेडरूमसह अध्यक्षांचे कार्यालय आहे. मेक्‍सिकोचे अर्थमंत्री कार्लोस उर्जुआ यांनी रविवारी स्वत:च विमानाची तपासणी केली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)