सौदीत मरण पावलेल्या भारतीयाचा मृतदेह 54 दिवसांनी मायदेशी 

प्रातिनिधिक छायाचित्र

नॉयडा: सौदी अरेबियात मरण पावलेल्या भारतीय नागरीकाचा मृतदेह तब्बल 54 दिवसांनी मायदेशी धाडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. इरफान खान असे या मृत भारतीय युवकाचे नाव आहे. विजेचा झटका बसल्याने त्याचा 11 सप्टेंबर रोजी सौदीत मृत्यू झाला होता. हा मृतदेह सोमवारी त्याच्या उत्तरप्रदेशातील नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला आहे. सरकारी पातळीवर कागदपत्रांच्या पुर्ततेबाबत झालेल्या हलगर्जीपणामुळे हा विलंब झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

हा मृतदेह ताब्यात मिळण्यास झालेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे मुलाच्या वडिलांनी सौदीत जाऊन मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्या खर्चासाठी त्यांना पैसे जमवणे शक्‍य झाले नाही. इरफान नोकरीसाठी गेल्या जुलै महिन्यात सौदीत गेला होता. त्याच्या मागे पत्नी आणि एका सहा वर्षाचा मुलगा असा आहे. आपल्या मुलाला तेथे दोन वर्षांसाठीचे वर्क कॉन्ट्रॅक्‍ट मिळाले होते अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मुलाच्या मृतदेहाच्या संबंधात भारत सरकारकडेही आम्ही दाद मागितली होती पण त्यांच्या प्रयत्नांनाही लवकर यश आले नाही असे ते म्हणाले. तथापी धिरेंद्र सिंग या स्थानिक आमदाराने आम्हाला या बाबतीत खूप मदत केल्याची कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)