पुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद

पुणे : येथे सुरु असलेल्या महापौर श्री 2018 स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अवधूत निगडेने 55 किलो वजनी गट, नितीण म्हात्रे 60 किलो वजनी गट, गणेश आर्मुले 65 किलो वजणी गट, दिनेश कांबळी 70 किलो वजनी गट, मोहनीश अहिर 75 किलो वजनी गट, सागर कातुर्डे 80 किलो वजनी गट, अजय नायर 85 किलो वजनी गट तर महेंद्र चव्हानयाने 85 किलो पेक्षा जास्त वजनी गटाचे विजेतेपद पटकावले असून यावेळी सागर कातुर्डेला पुणे महापौर श्रीचा किताब मिळाला. तर अभिषेक खेडेकरला बेस्ट पोझर आणि दिनेश कांबळीला मोस्ट इप्रूव्हड बॉडी बिल्डरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी झालेल्या 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अवधूत निगडे याने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई उपनगरच्या नितिन शिगवनने द्वितिय क्रमांक पटकावला आणि ठाणेच्या रमेश जाधवने तृतीय क्रमांक पटकावताना उल्लेखनीय कामगिरी केली. तर, 60 किलो वजनी गतांच्या सामन्यात ठाणेच्या नितिन म्हात्रे प्रथम तर मुंबई उपनगरच्या जितेंद्र पाटिल आणि संदेश सपकाळयांनी अनुक्रमे द्वितिय आणि तृत्तीय क्रमांक पटकावला.

65 किलो वजनी गटात ठाणेच्या गणेश आर्मुलेने प्रथम क्रमांक तर, मुंबई उपनगरच्या बप्पन दास आणि पुणेच्या सुरज सुर्यवंशी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. तसेच 70 किलो वजनी गटात ठाणेच्या दिनेश कांबळीने प्रथम तर योगेश निकमने द्वितीय आणि मनिष ससाणेने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात पुणेच्या मोहनीश आहेरने प्रथम क्रमांक तर, ठाणेच्या अक्षय देवकीने द्वितीय तर नांदेडच्या सुमितसिंग रावलने तृतीय क्रमांक पटकावला. तर, 80 किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या सागर कार्तुडेने पहिला क्रमांक पटकावला. तर, संदेश सावंतने दुसरा आणि जळगावच्या रवी वंजाअरीने तृतीय क्रमांक पटकावताना सुरेख कामगिरी केली.

तर, 85 किलो वजनी गतांच्या सामन्यात ठाणेच्या जय नायरने प्रथम तर पुणेच्या शिवानंद बिराजदार आणि ठाणेच्या प्रसाद बिराजदार यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. तर, 85 किलो पेक्षा जास्त वजनी गतांच्या सामन्यात पुणेच्या महेंद्रचव्हानने प्रथम तर मुंबई उपनगरच्या निलेश दगडेने द्वितीय आणि ठाणेच्या महेश रावने तृतीय क्रमांक पटकावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)