‘गणपती महोत्सव श्री 2018’ शरीर सौष्ठव स्पर्धा रविवारी

संग्रहित छायाचित्र

नगर – अ.नगर डिस्ट्रीक्‍ट बॉडी बिल्डर्स व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी सालाबादाप्रमाणे रविवार दि.16 स्पष्टेंबर रोजी मानाची शरीर सौष्ठव स्पर्धा अक्षता गार्डन, नगर-पुणे रोड, सक्कर चौक, येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

ही स्पर्धा एशियन सचिव डॉ.संजय मोरे , आमदार संग्राम जगताप, लॉरेन्स भैय्या स्वामी, बाबुशेट टायरवाले, आंतरराष्टीय कुस्तीगीर अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी, माजी नगरसेवक विनोद दादा कदम, नगरसेवक विपुल शेटीया, युवानेते ओंकार कैलासमामा गिरवले, शिवाजी शिंदे, वृषभ भंडारी, जोएब खान, नाज शेख,मनविसे प्रमुख सुमीत वर्मा, लौकीक शिंगवी, नादीर शेख, जावेद सय्यद, निष्णात गिल्डा, इम्रान शेख, इटर नॅशनल बॉडी बिल्डर प्रताप भोगाडे, भैय्या बॉडी बिल्डर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष महेशदादा सातपुते, उपाध्यक्ष विक्रमभाऊ भोगाडे, कार्याध्यक्ष महेश गोसावी, राष्ट्रीयपंच सोहेब शेख, ऍड.मिलिंद घोरपडे, खजीनदार अमोल गायकवाड, दत्ता रणसिंग, नितीन मारखे, जेम्स ससाणे, नाना गवळी, अभय हतावाई, सर्फराज पठाण, केतन देशमुख, तुषार पारघे, सागर येवले, तौसिफ शेख, जमीर पठाण, शहा मन्सुर सुभेदार, पंकज भंडारी, सद्दाम सय्यद, अर्शद बागवान, विनोद सुटेक, यांनी केले.

वरील सर्व स्पर्धकांना पहिल्या पाच क्रमांकासाठी रोख बक्षिसे, टी शर्ट, पहिल्या दोन क्रमांकास ट्रॅक सुट, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमथमच बापु मास्टर श्री स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेतून गणपती महोत्सव श्री 2018 बेस्ट पोझर, मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर, मोस्ट मस्क्‍युलर मॅन निवडण्यात येणार असून त्यांना रोख बक्षीस आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, मेडल, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. असे संघटनेचे सरचिटणीस माननीय माजी प्राचार्य डॉ.जयंत सुधाकर गिते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)