बॉडी बिल्डींग स्पर्धेत शुभम भोईटे एल. बी. एस. श्री चा मानकरी

सातारा – येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्‌, सायन्स ऍण्ड कॉमर्समध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सातारा जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन सातारा यांच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हास्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा दि. 24 डिसेंबरला महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एल. बी. एस. श्री चा मान शुभम भोईटे यांनी पटकावला. तर महाविद्यालयीन गटात निखिल साळुंखे याने एलबीएस श्री चा मान पटकावला.

या स्पर्धेचे आयोजन सातारचे प्रसिध्द उद्योगपती अस्लमभाई तांबोळी यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ हे होते. कार्यक्रमास अल्लाउद्दीन शेख, चंद्रशेखर घोडके, हरिश्‍चंद्र इंगवले, प्रा. सुहास साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी अस्लमभाई तांबोळी यांनी मनोगत व्यक्‍त करताना म्हणाले की शरीरसौष्ठव मिळवण्यासाठी तरूणांनी कष्टाची तयारी ठेवावी. या स्पर्धेत जिल्ह्यातील 40 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, चंदू पवार, ऍड. नितीन माने, अमित कासट, यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे व प्रा. माने मिथून यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास जाधव तर बिराजे आदिनाथ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)