पालिका अधिकाऱ्यांना मारहाण भाजप नगरसेवकाला भोवली

उच्च न्यायालयाचा आदेश : वॉर्डात फिरून बेकायदेशीर होर्डिंग शोधून रितसर तक्रार द्या

मुरजी पटेल यांना 24 लाखाचा दंड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई – बेकायदा होर्डींग विरोधात कारवाई करण्यास आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना हे प्रकरण चांगलेच भोवली. न्यायालयाने मुरजी पटेल यांना नुकसान भरपाई म्हणून 24 लाखाचा दंड ठोठावला. ही रक्कम दोन महिन्यात पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर आठवड्यातला एक दिवस आपल्याच वॉर्डात फिरून शाळा, मैदाने, हॉस्पिटल इत्यादी परिसरात फिरून बेकायदेशीर होर्डिंग शोधून त्याची रितसर तक्रारही पटेल यांनी करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

राज्यभरातील बेकायदेशीर होर्डींगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. बेकायदा होर्डींगविरोधात कारवाई करण्यास आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणी केल्याचे उघड झाल्यानंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत पटेल यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान नोटीस जारी केली होती.
सुरूवातीला मारहाण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात गुन्हा दाखल असल्याने जबाबदारी स्विकारण्यास टाळणाऱ्या पटेल यांना न्यायालयाने दणका दिल्यानंतर या प्रकरणाची सर्व जबाबदारी स्विकारत न्यायालयाची विनशर्त माफी मागीतली. तसेच या पुढे एकही बेकायदेशीर होर्डिंग लावणार नाही, अशी लेखी हमी न्यायालयात सादर केली. त्यानंतर न्यायालयाने 24 लाखाचा दंड ठोठावला.

यापुढे नगरसेवक मुरजी पटेल यांना बेकायदा होर्डिंग लावता येणार नाही. त्याचबरोबर आपल्या वॉर्डमध्ये आठवड्यातून एक दिवस फेरफटका मारून शाळा, मैदाने, हॉस्पिटल इत्यादी परिसरात फिरून बेकायदेशीर होर्डिंग शोधून त्याची रीतसर तक्रार करावी लागणार आहे. तसेच दोन महिन्यांनंतर पालिकेला केलेली नुकसानभरपाई आणि बेकायदेशीर होर्डिंगच्या संदर्भांत करण्यात आलेल्या तक्रारींचा लेखाजोखाही ही पटेल यांना न्यायालयात सादर करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)