Blog ते vlog…

80-90 च्या दशकात जन्मलेले आपण… तसं पाहिले तर आपल्या आधीच्या पिढीपेक्षा कमी पाऊस पाहिलेले… पण तंत्रज्ञानाचा खजिना आपल्याला जणू बाळकडू प्रमाणे मिळालं. तुम्हांला आठवतं का तुम्ही हाताळलेला पहिला कॉम्पुटर… ती फॉल्पी 1.44 mb इतकी स्पेस असायची त्यात… STDऊ बूथ वरचा डायल असलेला फोन ते मोबाईल क्रांती… सगळं कसं आपण अगदी जवळून बघितलं… मला आठवतं पहिला मोबाईल आला, तेव्हा आउटगोइंगला ही पैसे असायचे. तर अश्‍या या तंत्रज्ञानाचा प्रवसात पुस्तकरूपी ज्ञान ही कॉम्पुटर, मोबाईलमुळे हातात आले.

त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षापूर्वी ब्लॉग ही संकल्पना जन्माला आली. एखादी माहिती तुम्ही तुमच्या भाषेत लोकांसमोर मांडू शकता पण ती जगासमोर मांडायची असेल तर ब्लॉग लिहायला सुरुवात झाली. ब्लॉगचा विषय काहीही असू शकतो… अगदी खाण्याच्या रेसिपी पासून ते भटकंती, गजेट रिव्हू, प्रोग्रामिंग, कविता, लेख, इतिहास, अगदी काहीही… कित्येकदा आपण ही नवीन ठिकाणी जाताना त्या जागी आधी गेलेल्या लोकांचे भटकंतीचे ब्लॉग वाचले असतील. कालांतराने या ब्लॉगवर त्या संदर्भाचे फोटोही अपलोड होऊ लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा ब्लॉग म्हणजे एकप्रकारे माहितीचा खजिना आणि याचं असंच चलचित्रपटांचा खजिना म्हणजे व्लॉग(vlog)… तर या व्लॉगबद्दल थोडं जाणून घेऊया. 2005 साली युट्यूब अस्तित्वात आले आणि विडीओची परिभाषा बदलून टाकली.

नाटक, सिनेमा आणि टेलीव्हिजन अश्‍या तीन प्लॅटफॉर्मला टक्कर देयील असा नवीन मंच लोकांना मिळू लागला. आपलाच कॅमेरा, आपलच स्क्रिप्ट, आपलाच आवाज आणि आपलीच ऍक्‍टिंग… मग काय ब्लॉगच व्लॉगमध्ये रुपांतर होऊ लागलं. आणि आजघडीला कितीतरी हजार व्लॉग इंटरनेट वर चालू आहेत. तर या व्लॉगमुळे तुम्हांला हव्या असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवता येतात… बरं याला भाषेचं बंधन नाही… कोणत्याही भाषेत तुमचा विडीओ बनवा, कितीही साईझ असो, काहीही स्क्रिप्ट असो इथे सगळं चालता… फक्त कॉपीराईट वायलेंस न करता…
हातात असलेल्या मोबाईल कॅमेराने ते डीएसएलआर किंवा Gopro सारख्या प्रोफेशनल कॅमेराने ही हे विडीओ काढले जातात आणि अगदी फ्री विडीओ एडीटर किंवा प्रोफेशनल एडिटर ने ते एडीट करून अपलोड केले जातात. आपल्या मराठमोळ्या बांधव ही या व्लॉग च्या शर्यतीत मागे नाही बरं का…

नवीन येणाऱ्या मूवीचा ट्रेलरचा ब्रेकडाऊन (LOLDarshan) असो किंवा भटकंती (झी मराठी भटकंती, Jeevan Kadam Vlogs, सफर मराठी, रानवाटा) किंवा खवय्येगिरी किंवा गर्दीसोबत प्रंक किंवा नवीन येणारे गॅजेट-बाईक-कार रिव्हू (Ankit Vengurlekar) किंवा stand up कॉमेडी किंवा कन्टेन्ट आधारित (Be Younick, मराठी किडा, मराठी कन्या) असे भन्नाट विडीओ ब्लॉग म्हणजेच व्लॉग तुम्हांला पाहायला मिळतील. यामध्ये आपल्या मराठी सिनेतारे-तारकाही मागे नाहीत…Vlogs मध्ये नुकताच उर्मिला निंबाळकर या अभिनेत्रीनेही व्लॉग सुरु केलाय. काही व्लॉग तुमच्या दिवसभराचा थकवा घालवतात तर काही तुमच्या ज्ञानात भर घालतात, काही तुम्हाला नवीन उमेद देतात. मग तुम्ही कोणकोणते व्लॉग बघता आणि कोणते सबस्क्रायब केलेत हे आम्हांला नक्की कळवा.

– प्रशांत खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)