वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा होण्याची चिन्हे
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग अर्थात एनएच 04 दरम्यान दोन टप्प्यांत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दि. 15 मे ते 17 मे आणि दि. 21 मे ते 23 मे या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथकाने दिली.
पावसाळ्यामध्ये महामार्गावर वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. यामुळे वाहनांचा खोळंबा होतो. या प्रकाराबाबत खबरदारी घेण्याच्या उद्देशाने या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ढिल्या झालेल्या दरडीचे दगड काढण्यात येणार आहेत.
सकाळी 10 ते दुपारी 4.15 या वेळामध्ये द्रुतगती मार्ग (तळेगाव टोलनाका) येथून एन.एच. 04 ला जोडणाऱ्या मार्गावरील उर्से खिंड या मार्गावर दि. 15 मेपासून काम करण्यात येत आहे, असे महामार्ग पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.