पश्चिम बंगाल : मकरमपूरमधील तृण मूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात स्फोट

कोलकाता – पश्चिम बंगाल येथील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील मकरमपूरमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृण मूल काॅग्रेस (टीएमसी) पक्षाच्या कार्यालयात एक भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, यामध्ये कार्यालयातील एका टीएमसी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे तर पाचजण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार हा स्फोट सकाळी दहा वाजता झाला. या घटनेशी संबंधित लोकांनी सांगितले की, टीएमसी कार्यालयाच्या आत क्रूड बाॅम्ब स्फोट झाला की गॅस सिलेंडरमुळे स्फोट झाला हे अद्यापही कळू शकले नाही.

-Ads-

टीएमसी आमदार प्रद्युत घोष यांनी सांगितले की, अजूनपर्यत तरी स्फोटाचे कारण समजले नाही आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. स्फोटातील जखमीना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)