इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्रयोगशाळेत स्फोट; एका संशोधकाचा मृत्यू 

बंगळुरू: येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन एका संशोधकाचा मृत्यू झाला तर अन्य तीन संशोधकांना गंभीर इजा झाली आहे. ही घटना आज दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेमध्ये मरण पावलेला एक संशोधक तसेच गंभीर जखमी झालेले अन्य तीन संशोधक भारतीय विज्ञान संस्थेच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या सुपर वेव्ह टेकनॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहेत. सुपर वेव्ह टेकनॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही शॉकवेव्ह आणि त्यांचा विविध क्षेत्रातील वापर यावर संशोधन करणारी संशोधन संस्था असून, या संस्थेच्या नावावर अनेक पेटंट्स देखील नोंदविलेले आहेत.

या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या तसेच जखमी झालेल्या संशोधकांबाबत अन्य कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)