स्विसबॅंकांतील भारतीयांचा वाढता काळा पैसा आश्चर्याची बाब नाही : सीताराम येचुरी  

नवी दिल्ली : स्विसबँकांमध्ये भारतीयांच्या पैसे जमा करण्याच्या प्रमाणात २०१७ मध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी स्विसबॅंकांतील भारतीयांचा वाढता काळा पैसा आश्चर्याची बाब नाही अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. स्विसबँकांमधील भारतीयांचे पैसे वाढत असतानाच, नरेंद्र मोदी सरकार मात्र उद्योजकांचे लाखो कोटींचे कर्ज माफ करून त्यांना परदेशात पळून जाण्याचा मार्ग मोकळा करत आहे. नरेंद्र मोदींसारख्या ‘चौकीदाराच्या’ निगराणीत जनतेच्या पैश्याची लूट होणे आश्यर्याची बाब नसल्याचे देखील ते म्हणाले.
सबंधित वृत्त
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)