रविशंकर प्रसाद यांना काळे झेंडे दाखवले

पाटणा – बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्या ऐवजीची उमेदवारी जाहीर झालेल्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना आज काळे झेंडे दाखवण्यात अले. उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रथमच पाटणा साहिब येथे आलेल्या प्रसाद यांना विमानतळावरच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पाटणातील रहिवासी असलेल्या रविशंकर प्रसाद यांचे वडील राज्य मंत्रिमंडळात मंत्री आणि जनसंघाचे नेते होते. त्यांना राज्यसभेतील खासदार आर.के.सिन्हा यांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले. आर.के. सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची आशा होती.

या प्रकारामुळे गोंधळलेल्या प्रसाद यांनी विमानतळावरून काढता पाय घेतला. विमानतळावर उपस्थित असलेल्या पत्रकारांना उद्देशून त्यांनी आपल्यावर पक्षाने दाखवलेल्या जबाबदारीबाबत धन्यवद दिले.

याच वेळेस आर.के.सिन्हा आणि प्रसाद यांच्या समर्थकांमध्ये हमरीतुमरी झाली आणि सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करायला लागला. दोन्ही गटापैकी कोणाला ताब्यात घेतले गेले का, हे समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)