नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून प्रमुख पक्षांकडून सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे माजी खासदार कॉंग्रेसच्या गळाला लागले आहे.
हिमाचल प्रदेशमधील हरीमपूर मतदारसंघातून तीन वेळा खासदारकी जिंकलेले माजी भाजप खासदार सुरेश चंदेल यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. चंदेल यांनी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत हिमाचल प्रदेशचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड आणि प्रदेश प्रभारी रजनी पाटील उपस्थित होते. कॉंग्रेस प्रदेशापूर्वी भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही झाले होते.