मनमोहनसिंग यांच्या जॉब लेस ग्रोथ आक्षेपाला भाजपचे उत्तर

बंगळुरू – मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली असून देशातील युवक भांबावलेला आहे. या सरकारच्या काळात नवीन रोजगाराच्या संधी तर हिरावल्या गेल्याच पण आहेत त्या नोकऱ्याही गमावण्याची अनेकांवर पाळी आली असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली होती पण ही टीका भाजपने अमान्य केली आहे.

भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांच्या काळात पायाभूत सुविधांवर दहा लाख कोटी रूपये खर्च केले आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. पीएफ अकौंटची वाढलेली संख्या हे त्याचे द्योतक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या फुटलेल्या अहवालाच्या आधारे मनमोहनसिंग यांनी कदाचित ही टीका केली असावी पण ती चुकीची आहे असे त्यांनी म्हटले आहे. तो केवळ एक सर्व्हे आहे तो प्रत्यक्ष डाटा नव्हे असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने पायाभूत सुविधांवर जो दहा लाख कोटींचा खर्च केला आहे त्यामुळे रस्ते, बंदर, रेल्वे विकासाची अनेक कामे झाली आहेत त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधीकडे दुर्लक्ष करता येणार नाहीं.

मनमोहनसिंग यांनी जेव्हा 2014 मध्ये सत्ता सोडली होती त्या काळापेक्षा देशाची अर्थव्यवस्था आज अतिशय मजबुत असल्याचा दावाही त्यांनी केला. नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्चा अहवालात अनेक बाबी विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी अनेकांची रोजगार गेले असल्याचा अहवाल दिला असावा अशी टिपण्णीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)