निवडणूक फंडामुळे भाजप मालामाल

निवडणूक फंडात एकट्या भाजपची भागीदारी 94.5 टक्के

नवी दिल्ली: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने इलेक्‍टोरल बॉन्डच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी जमविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपला 2017-18मध्ये 210 कोटी निवडणूक देणग्या मिळाल्या आहेत.

भाजपने वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षाचा ऑडिट रिपोर्ट निवडणूक आयोगाकडे जमा केला आहे. ऑडिट रिपोर्टनुसार, इलेक्‍ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला 210 कोटी दोन हजार रूपयाचा चंदा मिळाला आहे. कॉंग्रेसने आपला ऑडिट रिपोर्ट अद्याप सादर केलेला नाही.

मात्र, 31 मार्च 2018 पर्यंत इलेक्‍ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निवडणूक फंडात एकट्या भाजपची भागीदारी 94.5 टक्के एवढी आहे. राजकीय पक्षांना मिळणारा फंड पारदर्शक पध्दतीने मिळावा यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2016 मध्ये इलेक्‍ट्रोल बॉन्डची घोषणा केली होती. याचा 2017-18 मध्ये सर्वाधिक फायदा झाला तो भाजपला. मार्च 2018 मध्ये सरकारने एकूण 222 कोटी रूपयाचे बॉन्ड जारी केले होते. यातील 210 कोटी रूपये भाजपच्या तिजोरीत जमा झाले.

भाजपला 2017-18 या आर्थिक वर्षांत एकूण 1027 कोटी रूपयाचा निवडणूक फंड मिळाला होता. दुसरीकडे, कॉंग्रेसने मात्र अजूनही रिपोर्ट सादर केलेला नाही. मात्र, निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून कॉंग्रेसला 10 कोटीपेक्षा जास्त फंड मिळाला नसेल. भाजपला 2016-17 मध्ये 1000 कोटी रूपयाचा फंड मिळाला होता. भाजपला 2017-18 मध्ये 1027 कोटी रूपयाचा फंड मिळाला आहे. यातील 758 रूपये खर्च करण्यात आले. यातील 567 कोटी रूपये पक्ष आणि निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करण्यात आले. 22 कोटी रूपये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च झाले तर 143 कोटी रूपये प्रशासकीय कामकाजावर खर्च झालेत.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनजी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणूक बॉंडच्या माध्यमातून एक कवडी सुध्दा मिळाली नसल्याचे त्यांनी आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)