मला व प्रणितीलाही होती भाजपची ऑफर : सुशिलकुमार शिंदे याचा गौप्यस्फोट

सोलापुर – भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मला भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती. आपली कन्या आमदार प्रणिती हिलाही भाजपकडून वारंवार ऑफर देण्यात आल्या होत्या. पण कॉंग्रेस आमच्या रक्तातच आहे त्यामुळे या ऑफरचा विचार होणे शक्‍य नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केले आहे.

आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा दावा केला. पण भाजपच्या कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की भाजपचा हा नेता आपल्या तोडीचा होता पण आपण त्याचे नाव सांगणार नाहीं. यावेळी बोलताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की ते घटनाकारांचे नातू आहेत पण त्यांच्याकडूनच संविधानाला गाडण्याचे काम केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)