भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडें, मनसे यांच्यात रंगले ट्विटयुद्ध

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या ट्विटनंतर आता विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडेंनी एक छोटीशी कविता आपल्या खात्यावरून ट्विट करत आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेकडूनही आशिष शेलारांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तर आता धनंजय मुंडेंनी एक कविता ट्विट करत आशिष शेलारांवर टीका केली. यामध्ये आशिष शेलारांचे तोंड फुटके खापर असल्याचे म्हंटले आहे. तसेच आशिष शेलार म्हणजे बोलघेवडा असल्याचा टोमणा देखील धनंजय मुंडेंनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे.

तर यापूर्वी मनसेने देखील ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलारांवर टीकेची झोड उठविली होती. यामध्ये टीका करताना मनसेने कविता लिहीत आशिष शेलारांना बारावा राखीव खेळाडू असून, त्यांचे मंत्रिपद हुकलेले आहे, असे म्हंटले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)