छत्तीसगडमध्ये भाजपकडून खासदारकीचे सर्व चेहरे नवीन : रमणसिंग यांची माहिती

छत्तीसगड – देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवार घोषित करण्याची लगबग सुरू आहे. अशातच आज छत्तीसगडमध्ये भाजपकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांनी आज माहिती दिली की राज्यामध्ये भाजपद्वारे लोकसभेसाठी उभा करण्यात येणारे सर्व उमेदवार नवीन असणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या खासदारकीच्या उमेदवारांना यावेळी पक्षाकडून तिकीट देण्यात येणार नाही असेदेखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)