भाजपची यादी जाहीर ! ‘हे’ आहेत उमेदवार

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि मॅरेथॉन बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने १८२ उमेवारांची नावे घोषित केली आहेत. दरम्यान, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील १६ जागांवरील उमेदवारी घोषित करण्यात आले.

यामध्ये, नरेंद्र मोदी – वाराणसी, अमित शहा- गांधीनगर, नितीन गडकरी – नागपूर मधून लढणार आहेत…

केंद्रीय निवडणुकीच्या बैठकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्य, भाजप अध्यक्ष महेंद्र नाथ पांडेयही उपस्थित होते.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

  • चंद्रपूर- हंसराज अहिर
  • जालना- रावसाहेब दानवे
  • बीड- प्रीतम मुंडे
  • अकोला- संजय धोत्रे
  • वर्धा- रामदास तडस
  • रावेर- रक्षा खडसे
  • अहमदनगर- सुजय विखे पाटील
  • नंदुरबार – हीना गावित
  • धुळे – सुभाष भामरे
  • भिवंडी – कपिल पाटील
  • सांगली – संजयकाका पाटील
  • मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
  • लातूर -सुधाकारराव शिंगारे
  • नागपूर – नितीन गडकरी
  • मुंबई उत्तर मध्य -पूनम महाजन
  • गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते

  • वाराणसी – नरेंद्र मोदी
  • गांधीनगर – अमित शाह.
  • लखनौ – राजनाथ सिंग
  • अमेठी – स्मृती इराणी
  • बागपत – सत्यपाल सिंग
  • मुजफ्फरनगर – संजीव बालियान
  • गाजियाबाद – वी के सिंग
  • गौतम बुद्ध नगर – डाॅ महेश शर्मा
  • मथुरा – हेमा मालिनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)