बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कुल

बारामती – बारामती लोकसभा मतदार संघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी दि.23 एप्रिलला मतदान होत असल्याने राष्ट्रवादीकडून पहिल्याच यादीत सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाकडूनही बारामती मतदार संघाबाबत निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बैठकांवर बैठका घेतल्या होत्या. सुळे यांच्या विरोधात लढणारा उमेदवार सर्वांगिण बाबींवर तगडा असावा, हे सुत्र आजमावून पाहताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामती शहरासह मतदार संघातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर कांचन कुल यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान, बारामती मतदार संघात 2014 मध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. तेच जानकर आता रासपचे एकमेव आमदार असलेले राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना पाठबळ देणार आहेत. बारामती मतदार संघात मंत्री जानकर यांच्या बाजुने मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्याकडून कुल यांना मिळणारी मदत निर्णायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)