आडवाणींसारख्या ज्येष्ठांचा भाजपने केला अवमान – शत्रुघ्न सिन्हा

भाजपने न्युटनचा तिसरा नियम विसरू नये 

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आपले गुरू आणि राजकारणातील भीष्म पितामह लालकृष्ण आडवाणी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याचा भाजपने जो अवमान केला आहे तो अत्यंत गंभीर असल्याची टीका भाजपचेच बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. आडवाणी यांचे तिकीट कापून त्या मतदार संघात भाजपच्या विद्यमान अध्यक्षांना उमेदवारी देऊन त्यांना वेगळा संदेश द्यायचा आहे तो त्यांनी दिला आहे पण भाजप नेत्यांनी न्युटनचा तिसरा नियम लक्षात ठेवावा, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रीयाही असतेच असे त्यांनी म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आडवाणी यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही, पण आडवाणींच्या मतदार संघात त्यांच्या ऐवजी अमित शहा यांना उमेदवारी देऊन तसे भासवण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपने यशवंत सिन्हा, अरूण शौरी, मुरली मनोहर जोशी आणि त्यांच्या पाठोपाठ आता आडवाणी यांना ही वागणूक दिल्याने पक्षावर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)