भाजपची भ्रष्ट बोट आता तगणार नाही : रणदीप सुर्जेवाला

राफेल निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने राफेल विमानांच्या किंमतीची माहिती सादर करावी असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्याचे स्वागत करताना कॉंग्रेसने म्हटले आहे की भाजपच्या भ्रष्टाचाराची बोट आता जास्त काळ तगू शकत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संबंधात पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयानेच आता राफेल खरेदी प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यात स्वारस्य दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची ही बोट आता वाचण्याची शक्‍यता नाहीं. त्यांना आता चौकशीपासूनही दूर पळता येणार नाही. या व्यवहाराची संयुक्त संसदीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याची आमची मागणीही त्यांना आता मान्य करावी लागणार आहे असे ते म्हणाले. राफेल गैरव्यवहाराच्या जेपीसी चौकशीला सरकार का घाबरते असा सवालही सुर्जेवाला यांनी यावेळी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)