भाजपची घोषणा ठरली!  मोदी है तो मुमकिन है 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि करिष्म्याचा आधार घेऊन भाजप लोकसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्यातून मोदी है तो मुमकिन है ही घोषणा पक्षाने निवडणुकीसाठी निश्‍चित केली आहे.

याबाबतची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या ब्लॉगवरून दिली. अथकपणे कार्य करणारा आणि प्रत्यक्ष कृती करणारा नेता अशी मोदींची प्रतिमा पाच वर्षांच्या कार्यकाळात सिद्ध झाली आहे. गुंतागुंतीच्या विषयांवरही स्पष्टतेने आणि निर्धाराने तसेच तातडीने निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे, अशी स्तुतिसुमने जेटली यांनी उधळली. मोदी सरकारची कामगिरी अधोरेखित करताना जेटली यांनी पहिल्यांदाच सलग पाच वर्षे भारताने जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवल्याचे म्हटले.

-Ads-

सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला घडवून भारताने दहशतवादाविरोधात अपारंपरिक पाऊले उचलणार असल्याचे दाखवून दिले. महागाई कमी करणे, प्रामाणिक प्रशासन चालवणे, सवर्णांमधील आर्थिक मागासांना आरक्षण उपलब्ध करणे आणि जीएसटीची सुरळित अंमलबजावणी करणे अशा कामगिरी सरकारने केल्या, असे जेटली यांनी नमूद केले. कुठल्या सरकारने यापेक्षा अधिक कामगिरी केली आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)