भाजपची शिवसेनेबरोबरची युती राजकारणापलिकडची – मोदी 

नवी दिल्ली – भाजपची शिवसेनेबरोबरची युती राजकारणापलिकडची आहे. आमची युती ही महाराष्ट्राची पहिली आणि एकमेव पसंती ठरेल असा विश्‍वास वाटतो, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही पक्षांची युती जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. एकत्रितपणे निवडणुका लढवण्याच्या दोन्ही पक्षांच्या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मजबूत होईल. अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे या दिग्गज नेत्यांकडून प्रेरणा घेऊन युती महाराष्ट्राच्या कल्याणासाठी यापुढेही कार्यरत राहील. विकासाभिमुख, भ्रष्टाचारापासून दूर असलेले आणि देशाच्या सांस्कृतिक मुल्यांविषयी अभिमान असणारे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून देण्याची निश्‍चिती युती करेल. भारत मजबूत आणि विकसित बनावा या आकांक्षेने भाजप आणि शिवसेना एकमेकांशी जोडलेले आहेत, असे मोदींनी ट्‌विटरवरून म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)