राफेल घोटाळ्याच्या आरोपांविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

मुंबई: राफेल करारात घोटाळा झाल्याचे विरोधी पक्षांकडून भाजपवर सातत्याने आरोप केले जात आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्‍लीन चीट दिली असली तरी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल प्रकरणावरुन भाजपवर टीका करत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो)आज परळच्या कामगार मैदानाबाहेर आंदोलन केले.

या आंदोलनामुळे कामगार मैदानाजवळच असलेल्या कॉंग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. टिळक भवनाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच कॉंग्रेसच्या पोस्टरवरील राहुल गांधींच्या चेहऱ्याला काळे फासले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परळसह भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेसमोर असलेल्या कॉंग्रेस कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने सोडून दिले. भाजप नेते राज पुरोहित, सुनील राणे, मनोज कोटक या आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)